By  
on  

77 वर्षांच्या सायरा बानो यांची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये केलं दाखल

7 जुलै रोजी बॉलीवुड सुपरस्टार दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 वर्षी जगाचा निरोप घेतला. आता दिलीप कुमार यांच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतर सायरा बानो यांच्या प्रकृतीविषयी बातमी समोर आलीय. सायरा बानो यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलय. तीन दिवसांपूर्वी त्यांनी रुक्तदाबाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सूत्रांच्या माहितीनुसार सायरा बानो यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलय.  सायरा बानो यांचा रक्तदाब मात्र स्थिर नाहीये. ऑक्सिजन लेव्हल कमी असल्या कारणाने त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचं कळतय.

सायरा बानो यांनी त्यांच्या वयाची 54 वर्षे दिलीप कुमार यांच्यासोबत सुखी संसारात घालवली आहेत. दिलीप कुमार यांच्या आजारपणात सायरा बानो यांची साथ मोलाची होती. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. शाहरुख खानही त्यांच्या सात्वनासाठी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचले होते तेव्हा शाहरुखला बघूनही त्या भावुक झाल्या होत्या. 

 

 सायरा बानो यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सोशल मिडीयावरील त्याचे हितचिंतक प्रार्थना करत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठीच्या पोस्टही करत आहेत. वयाच्या 16 व्या वर्षी सायरा बानो यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांच्या सिनेकारकिर्दीत त्यांनी आत्तापर्यंत दिग्गज कलाकारांसोबत काम केलय. सौंदर्य, अदा आणि हटके अभिनयकौशल्याच्या जोरावर सायरा बानो यांनी सिनेविश्वात एक वेगळी ओळख निर्माण केलीय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive