Confirmed:ऑनस्क्रिन भावाच्या मुलीला लॉंच करतोय सलमान खान

By  
on  

नव-नवे चेहरे इंडस्ट्रीत लॉंच करण्यात दबंग खान नेहमीच उत्साहाने पुढाकार घेतो. त्याने बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक नवीन चेह-यांना सिनेमात झळकण्याची संधी दिली आहे तर काही स्टार किड्सनासुध्दा या चंदेरी दुनियेत आणलं आहे. आपल्या बहिणीचा नवरा आयुष शर्माला ‘लवरात्री’ सिनेमाद्वारे लॉंच केल्यानंतर सलमान खान आता आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत घेऊन येतोय. काही दिवसांपूर्वीच हे वृत्त पिपींगमूनने दिलं होतं. सलमान आपला ऑनस्क्रीन भाऊ आणि खास मित्र मोहनीश बहलची मुलगी प्रनुतन बहलला आगामी सिनेमाद्वारे लॉंच करतोय.

सिनेजाणकार तरण आदर्श यांनी ट्विट करत याबाबतची अधिकृत माहिती सर्वांना दिली. ते म्हणाले, ज्येष्ठ अभिनेत्री नूतन यांची नात आणि मोहनीश बहलची मुलगी प्रनुतन बहलला सलमान खान लॉंच करतोय. ती न्यू कमर असलेलाच जहीर इकबालसोबत झळकणार आहे. या आगामी सिनेमाची निर्मिती सलमानम खान फिल्म्स, मुरद खेतानी आणि अश्विन वर्दे करत असून संपूर्णपणे काश्मिरमध्ये चित्रीत होणा-या या सिनेमाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करत आहेत.

सलमान खाननेसुध्दा एक ट्विट करत या वृत्ताला दुजोरा देत म्हटलं, “ही मुलं किती लवकर मोठी होतात ना.. स्वागत करा प्रनुतन बहसचं. जहीरोला हिरोईन मिळाली. नूतनजींच्या नातीला आणि मोहन्याच्या मुलीला लॉंच करताना गर्व वाटतोय. ”

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1041565369758957568

मागच्याच वर्षी प्रनुतनने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपण बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आतुर असल्याची इच्छा व्यक्त केली होती. लवकरच प्रनुतनची ही इच्छा पूर्ण होत आहे. ब-याचवेळा आजी नुतनसह प्रनुतनची तुलना करण्यात आली आहे.

आतापर्यंत सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, झरीन खान, अथिया शेट्टी, सूरज पांचोली यांसारख्या अनेक नवोदितांना सलमानने इंडस्ट्रीत आणले आहे. सलमान खान आपल्या प्रोडक्शनच्या सिनेमासाठी नवीन चेह-याच्या शोधात होता आणि हा नवा चेहरा आता त्याला सापडला आहे.

Recommended

Loading...
Share