By  
on  

'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर सलमान खानची भावुक पोस्ट, म्हटला

टेलिव्हिजन स्टार सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. बॉलिवुड कलाकारही सिद्धार्थच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहेत. यातच सलमान खानलाही सिद्धार्थच्या निधनाने मोठा धक्का बसलाय. सिद्धार्थ हा बिग बॉस 13 चा भाग होता त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची सलमानसोबत अनेकदा भेट आणि संवाद झाला होता. 

सलमानला ही बातमी कळताच त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करून सिद्धार्थच्या परिवारासाठी सांत्वनपूर्ण पोस्ट शेयर केली आहे. सलमानने ट्विट करून लिहीलय की, "खूप लवकर गेलास सिद्धार्थ.. तुझी आठवण येईल. कुटुंबासाठी संवेदना.. रेस्ट इन पीस."

 

सिद्धार्थ हा बिग बॉस 13 चा विजेता ठरला होता. त्यानंतरच्या सिझनमध्येही त्याने हजेरी लावली होती. नुकतीच ओटीटी बिग बॉसच्या मंचावरही तो शहनाज सोबत हजर दिसला. आजची सकाळ ही मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने झाली. त्याच्या राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झाल्याचं म्हटलं जातय. 40 वर्षांचा सिद्धार्थने जगाचा निरोप घेतलाय. सध्या त्याचं पार्थिव कूपर रुग्णालयात ठेवण्यात आलय.

 सिद्धार्थच्या कुटुंबियांकडून अद्याप कोणतही स्टेटमेंट समोर आलेलं नाही. पण पोलिसांनी यासंदर्भात तपास करण्यास सुरुवात केलीय. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूच कारण शोधण्यासाठी मुंबई पोलीस तपास करत आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ हा त्याच्या बेडरुममध्ये त्याची आई आणि कथीत गर्लफ्रेंड शहनाज यांना मृत अवस्थेत दिसला होता. सध्या डॉक्टर सिद्धार्थचा मेडिकल इतिहासही तपासून पाहत आहेत. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive