By  
on  

Bday Spl: दिग्दर्शक महेश भट यांच्या वाढदिवशी त्यांच्या सडक-2चं टिझर

दिग्दर्शक महेश भट आता ब-याच वर्षानंतर इंडस्ट्रीत पुनरागमन करत आहेत. संजय दत्त आणि पूजा भट अभिनित ‘सडक’ हा 1991 प्रदर्शित झालेला महेश भट दिग्दर्शित सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता या सिनेमाचा सिक्वेल लवकरच झळतोय. महेश भट यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ‘सडक 2’चा टिझर प्रदर्शित झाला आहे.

‘सडक 2’मध्ये संजय दत्त आणि पूजा भट यांच्यासोबतच आलिया भट व आदित्य रॉय कपूरही झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच आलिया आणि पूजा भट या दोघी बहिणी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. संजय आणि आलियाने आपल्या सोशल मिडीयावर सडकच्या सिक्वेलचं टिझर पोस्टर शेअर केलं आहे. जवळपास तब्बल 27 वर्षानंतर ‘सडक’ सिक्वेल येतोय म्हटल्यावर बॉलिवूडसह सर्व प्रेक्षकही प्रचंड उत्सुक आहेत.

https://twitter.com/duttsanjay/status/1042621677748797446

दरम्यान, सडक हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. त्यामुळे ‘सडक 2’ हा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive