पाहा व्हिडीओ: जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचं झिंगाट वर्कआऊट

By  
on  

श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हे दोघेही सध्या खुप खुशीत अहेत. दोघांनीही बॉलिवूडमध्ये ‘धडक’ एन्ट्री घेतली. त्यांच्या पदार्पणातीलच सिनेमाने इतकं दणदणीत यश मिळालंय म्हटल्यावर ते साहजिकचं आहे म्हणा. या यशामुळे त्यांना भावसुध्दा चांगलाच वधारलाय. ‘धडक’मध्ये ईशान व जान्हवीच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांसोबतच संपूर्ण बॉलिवूडलाही भुरळ पाडली.

‘धडक’ सिनेमाचं प्रोजेक्ट जरी संपलं असलं तरी ईशान जान्हवीची मैत्री मात्र कायम आहे. दोघेही कुठे ना कुठे फिरताना किंवा जीममध्ये जाताना नेहमी स्पॉट केले जातात. आता नुकतंच या जोडीने एक धम्माल उडवून दिली आहे व ही धम्माल आपल्या चाहत्यांसोबतसुध्दा शेअर केली आहे.

जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ईशान आणि जान्हवी दोघंही आपल्या झिंगाट गाण्यावर फुल ऑन मस्तीमध्ये वर्कआऊट करताना दिसून येतायत. या गाण्याच्या बीटवर वर्कआऊट करण्याचा त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून तो पाहायला फारच मज्जा येतेय.

https://www.instagram.com/p/Bn_KbfmhY4O/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

‘धडक’नंतरसुध्दा या दोघांच्या मैत्रीच्या अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत. त्यामुळे एखाद्या आगामी सिनेमातसुध्दा ईशान आणि जान्हवी या जोडीची जादू पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share