असा आहे जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’मधील लूक

By  
on  

अभिनेता जॉन अब्राहमचा एक नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव आहे, 'बाटला हाऊस'. जॉनची या सिनेमातील व्यक्तिरेखा नुकतीच उलगडली आहे. संजीव कुमार या पोलिस अधिका-याच्या भूमिकेत जॉनला सिनेमात पाहता येणार आहे. या पोलिसाच्या लूकमध्ये तो फारच भारदस्त दिसतोय.

भारतातील सर्वात वादग्रस्त पोलिस अधिका-याची ‘बाटला हाऊस’ही कहाणी आहे. यापूर्वीसुध्दा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढविण्यासाठी ‘बाटला हाऊस’चे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. जॉनने हे पोस्टर सोशल मिडीयावर अपलोड करताना लिहलं होतं, “प्रत्येक कहाणीचे दोन पैलू असतात एक बरोबर आणि एक चूक असते. पण जर या दोघांधील रेखा जर फारच तकलादू असेल तर काय होईल?”

https://twitter.com/TheJohnAbraham/status/1043336252760633345

जॉनचा हा सिनेमा 13 सप्टेंबर 2008 रोजी बाटला हाऊस येथे घडलेल्या एन्कांऊंटरवर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन निखील अडवाणी करत असून त्यांच्या मते जॉनचं या सिनेमातील प्रमुख भूमिकेसाठी अगदी चपखल बसतोय.
‘बाटला हाऊस’हा सिनेमा पुढील वर्षी 15 ऑगस्ट 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सर्वांनचा सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

Loading...
Share