By  
on  

विक्की कौशल आणि दिपीका पादुकोणची ही जाहिरात तुम्ही पाहिलीत का?

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री दिपीका पादुकोण हे दोघेही एका जाहिरातीत नुकतेच झळकले. ही ऑन-स्क्रीन नवीन जोडी पहिल्यांदाच या जाहिरातीनिमित्त एकत्र पाहायला मिळाली. विक्की आणि दिपीकाची यातील केमिस्ट्री खुपच भारी जुळून आली आहे. जर दोघांनाही एखाद्या सिनेमात नायक-नायिका म्हणून घेतलं तर ही जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडणार याची तुम्हालासुध्दा ही जाहिरात पाहिल्यावर खात्री पटेल.

एका ट्रॅव्हल वेबसाईटची ही जाहिरात आहे. एका लग्नसमारंभाचा प्रसंग यात दाखविण्यात आला आहे. विक्की आणि दिपीका दोघंही या लग्नसमारंभात एकत्र उपस्थित असतात. त्यांच्या समोरच नवरा नवरी यांचे सात फेरे सुरु असतात. याच दरम्यान विक्की आणि दिपीका नवरा नवरीवर फुलांचा वर्षाव करता करता एकमेकांसोबत फ्लर्ट करतायत. इतकंच नव्हे या फ्लर्टमध्येच दिपीका या हॉटेल बुकींगसाठीच्या वेबसाईटची गुणवैशिष्टे विक्कीला सांगतेय. ही वैशिष्टे ऐकून त्याला ती आवडतात पण तो म्हणतो फार महाग असेल ना..दिपीका जेव्हा त्याला किंमत सांगते...तेव्हा इतकी स्वस्त किंमत ऐकून त्याचा त्यावर विश्वासच बसत नाही. यात दोघांची फारच अप्रतिम बॉन्डिंग दिसून आलीय. त्यामुळेच प्रेक्षकांनासुध्दा ती आवडेल यात शंका नाही.

विक्की कौशलचा नुकताच मनमर्जियॉं हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यातील त्याने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झाले. आगामी काळात जर विकी आणि दिपीकाला जर एकत्र पाहायला मिळालं तर अजिबातच आश्चर्य वाटू नये. या जाहिरातीमुळे तर त्यांना सिनेमात एकत्र पाहण्याची मोठी उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

 

https://youtu.be/Ulcy4u7q5QI

Recommended

PeepingMoon Exclusive