सनी लिओनीला होती ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ची ऑफर; पण या कारणामुळे केलं नाही काम

By  
on  

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीने नुकताच एक आश्चर्यकारक खुलासा करुन सर्वांनाच चकित करुन टाकलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सनीने सांगितलं की, प्रसिध्द शो गेम्स ऑफ थ्रोन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी देण्यात आली होती. फ्री प्रेस जर्नलला देण्यात आलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “एक दिवस मला मेसेज आला ज्यात लिहलं होतं सनी लिओनीची निवड गेम्स ऑफ थ्रोन्स या शोच्या एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे.” हा मेसेज वाचून सनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती खुप खूश झाली.

पण सनीचा हा आनंद जास्त वेळ टिकू शकला नाही. थोड्याच वेळात सनीने मेसेज पाठवणा-याचं नाव वाचलं आणि संपूर्ण आनंदावर विरजण पडलं. कारण मेसेज पाठवणा-याचं ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ या कार्यक्रमासोबत दूर दूरपर्यंत कुठलंच कनेक्शन नव्हतं. त्याने फक्त सनीला चीट करण्यासाठी तो पाठवला होता.

‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ हा प्रसिध्द टीव्ही शो खुपच बोल्ड कंटेटवर आधारित असल्याने सनी लिओनीने यात काम करणं काही नवल नव्हतं. पण सध्या तरी असं काहीचं होणार नाही. सनीची कोणीतरी ही टिंगल केली होती हे उघड झालं आहे. त्यामुळे चाहत्यांची निराशा होणं साहजिकंच आहे.

सनी लिओनी सध्या आपल्या आयुष्यावर आधारित वेबसिरीज ‘करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी’ च्या दुस-या सीझनच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे.

Recommended

Loading...
Share