अजय देवगणच्या ‘तानाजी द अनसंग वॉरियर'चा झाला शुभारंभ

By  
on  

अभिनेता अजय देवगणचा ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शिवाजी महारांजाचे शूरवीर योध्दे तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर सिनेमा येतोय म्हटल्यावर तमाम प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडलाही या सिनेमाची आतुरता लागून राहिली आहे. या बॉलिवूड ऐतिहासिकपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ‘लोकमान्य एक युगपुरुष’फेम ओम राऊत सांभाळणार आहे.

अजय देवगणची निर्मिती असलेल्या ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ सिनेमाच्या शुटींगचा शुभारंभ नुकताच झाला असून या मुहूर्त शॉटचा एक खास फोटो अजयने ट्विटरवरुन शेअर केला आहे. दिग्दर्शक ओम राऊतसुध्दा यावेळी त्याच्यासोबत यात पाहायला मिळतोय. यथासांग पूजा-अर्चा करुन त्यांनी या सिनेमाचा श्रीगणेशा केला आहे.

Exclusive: काजोल म्हणते मी आहे,अजयची टिचर; ‘तानाजी’साठी देतेय मराठीचे धडे

https://twitter.com/ajaydevgn/status/1044455840059740166

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणा-या शिवाजी महाराजांना या संघर्षात अनेक शिलेदारांची मोलाची साथ लाभली. त्यापैकी तानाजी मालुसरे यांचा सिंहाचा वाटा होता. ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजी मालुसरे यांच्या तडफदार भूमिकेत खुद्द अजय देवगणलाच पाहायला मिळणार आहे.

अजयचा ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ हा महत्त्वकांक्षी सिनेमा पुढील वर्षी 29 नोव्हेंबर 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

Recommended

Loading...
Share