By  
on  

सैफ अली खान म्हणतो, मी सिनेमे पैशांसाठी करत नाही

सॅक्रेड गेम्समध्ये आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडल्यानंतर सैफचा आगामी बहुचर्चित सिनेमा ‘बाजार’ अखेर लवकरच प्रदर्शित होत आहे. महत्त्वाचं म्हणजे यातसुध्दा त्याच्यासोबत अभिनेत्री राधिका आपटे झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे पार पडला.

‘बाजार’निमित्त आयोजित पत्रकारपरिषदेत यावेळी सैफला नानाविविध प्रश्न विचारण्यात आले. त्यानेसुध्दा त्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. जेव्हा त्याला त्याच्या सिनेमांच्या निवडीबाबात विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “ मी पैशांसाठी सिनेमे कधीच करत नाही. आज अनेक गोष्टींमध्ये बदल घडतोय. माझ्या वाट्याला नेहमीच काहीतरी सुंदर येत असतं. एक अभिनेता म्हणून मी आता खुप प्रगल्भ झालोय, असं मला वाटतं. माझ्याक़डे आता खुपच मजेशीर अशा सिनेमांच्या स्क्रिप्ट्स येत आहेत आणि मी त्यासाठी खुप आनंदी आहे.”

‘बाजार’ सिनेमातील भूमिकेसाठी सैफने खुपच रिसर्च आणि मेहनत घेतल्याचं त्याने यावेळी सांगितलं आहे. सैफ आणि राधिकासोबतच या सिनेमात अभिनेत्री चित्रांगदा सिंहसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या सिनेमातून रोहन मेहरा हा अभिनेता पदार्पण करत आहे.

https://youtu.be/Pb7iJnIWzNk

सैफची प्रमुख भूमिका असलेल्या सॅक्रेड गेम्सच्या दुसरा सीझन लवकरच येतोय. प्रेक्षकांनासुध्दा या आगामी सीझनच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive