By  
on  

सोनम कपूरच्या माहेरी झाली चोरी; याच बंगल्यात झालं होतं लग्न

वांद्रे येथील ज्या आलिशान बंगल्यात अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर ही उद्योगपती आनंद अहुजासोबत विवाहबध्द झाली त्याच बंगल्यात चोरी झाल्याची घटना घडली आहे. बॉलिवूडच्या या हाय प्रोफाईल बंगल्यात चोरांनी लाखोंचा माल लंपास केल्याचं आता उघड झालं असून चोरांनी या बंगल्यातील प्रत्येक खोलीत आपला हात साफ केला आहे. या खोल्यांमध्ये सोनमच्या लग्नातील अनेक महागड्या वस्तू होत्या, ज्या चोरांनी पळवल्याची माहिती मिळतेय.

पोलिसांकडून अद्यापतरी या चोरीबद्दल आणखी सविस्तर माहिती कळू शकलेली नाही. खरंतर हा बंगला अनिल कपूरची मेव्हणी म्हणजे सोनमच्या मावशीचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनमने ज्या बंगल्यात सात फेरे घेतले तिथूनच जवळपास 40 लाखांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. सोनम जेव्हा वांद्रे येथील आपल्या नवीन बंगल्यात शिफ्ट होणार होती तेव्हा ती आपल्या सर्व भेटवस्तू घेऊन जाणार होती, पण त्यापूर्वीच त्या चोरीला गेल्या आहेत.

मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्यात या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive