By  
on  

Confirmed: या दिवशी उलगडणार कंगनाच्या बहुचर्चित मणकर्णिका सिनेमाचा टिझर

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा महत्त्वकांक्षी आणि बहुचर्चित मणकर्णिका या ऐतिहासिक सिनेमाची सर्व आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता थोडीशी शमविण्यासाठी निर्मात्यांनी या सिनेमाचा टिझर येत्या गाँधी जयंती निमित्त म्हणजेच 2 ऑक्टोबरला या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. 1857 च्या उठावात झाशीच्या राणीने दिलेलं योगदान या सिनेमातून अनुभवता येणार आहे.

झी स्टुडिओजने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिकपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली असून पोस्टरवरुनच कंगनाचे झाशीच्या राणीच्या व्यक्तिरेखेतील महत्त्वकांक्षा दिसून येत आहे. बॉलिवूडसह सर्वांनाच आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे. कंगनाच्या ट्विटरवर कंगनाचा या सिनेमातील एक नवीन फोटो शेअर केला आहे. यात कंगनाने लाल रंगाची साडी नेसली असून भरपूर दागिने आणि भारदस्त अशा राणीच्या लूकमध्ये उठून दिसतेय. त्याचबरोबर तिच्यामागे श्रीगणेशाची मुर्तीदेखील दिसून येत आहे.

https://twitter.com/KanganaFanClub/status/1045879206415085570

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात कंगनासह तात्या टोपेंच्या भूमिकेत अतुल कुलकर्णी, सदाशिव म्हणून सोनू सूद तर अभिनेत्री अंकिता लोखंडे झलकारी बाई या महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. अंकिता या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेसाठी कंगनाने खास मेहनत घेतली आहे. तिने यासाठी तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. तसेच ती या सिनेमात घोडेस्वारीसोबतच अनेक स्टंट लिलया करताना पाहायला मिळणार आहे. एकूणच तिचं एक वेगळं आणि जुलमी ब्रिटीश राजवटीविरूध्दचं रौद्र रूप या सिनेमाद्वारे पाहणं फारचं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 प्रदर्शित होणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive