इंग्रजांच्या जुलमी राजवटीला मोडून काढणा-या झाशीच्या राणीचा इतिहास आपल्याला आगामी मणकर्णिका द क्विन ऑफ झांसी सिनेमात अनुभवता येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिनेमाची एक छोटीशी छलक या निमित्ताने पाहायला मिळाली. एका आक्रमक आवेशात मर्दानी झाशीच्या राणीच्या व्यक्तिरेखत कंगना चपखल बसलीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हातात तलवार घेऊन ब्रिटींशाविरुध्द लढा देण्यासाठी ती पूर्णपणे सज्ज झाली आहे. तसंच इंग्रज आणि झाशीच्या सैन्यामध्ये रंगलेलं तुफान युध्द ही पार्श्वभूमी दिसून येतेय.
सूत्रांच्या माहितीनुसार मणकर्णिकासाठी कंगनाने खुपच जबरदस्त असे अक्शन सीन्स दिले आहेत. तसेच या सिनेमातील राणी लक्ष्मीबाईच्या प्रमुख भूमिकेसाठी कठोर मेहनतसुध्दा घेतलीय. या सिनेमात घोडेस्वारीसोबतच अनेक स्टंट लिलया करताना पाहायला मिळणार आहे. तिने यासाठी तलवारबाजीचे धडे गिरवले आहेत. एकूणच तिचं एक वेगळं आणि जुलमी ब्रिटीश राजवटीविरूध्दचं रौद्र रूप या सिनेमाद्वारे पाहणं फारचं औत्सुक्याचं ठरणार आहे.
‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 प्रदर्शित होणार आहे.
https://youtu.be/eBw8SPPvGXQ