By  
on  

'तारक मेहता...'मालिकेतील नटखट खोड्या करणा-या नट्टू काकाचं निधन

छोट्या पडद्यावरुन गेली कित्येक वर्ष रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्माच्या अवघ्या टीमसाठी आणि तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी नुकतीच समोर आली. :‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील सर्वांचे लाडके नट्टू काका अर्थात अभिनेते घनश्याम नायक यांचं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. निर्माते असित कुमार मोदी यांनी घनश्याम नायक यांचं निधन झाल्याचं सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून घनश्याम नायक यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती, त्यांच्यावर उपचार सुरु होते.  अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक शस्त्रक्रिया झाली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive