पाहा Photos : देवदत्त नागेने शेयर केले 'आदीपुरुष'च्या सेटवरील फोटो, साकारतोय हनुमानाची भूमिका

By  
on  

ओम राऊतच्या 'आदीपुरुष' या पौराणिक कथेवर आधारीत सिनेमाची सिनेप्रेमींना उत्सुकता आहे. साऊथ स्टार प्रभास या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या सिनेमात प्रभाससह सनी सिंह, क्रिती सनॉन, सैफ अली खान, वत्सल सेठ आणि मराठीतील प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे देखील झळकणार आहे. रामायणावर आधिरत या सिनेमात प्रभास हा श्री रामाची भूमिका साकारणार तर सनी सिंह लक्ष्मण, क्रिती सनॉन सीता तर देवदत्तन नागे हा हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. 


या सिनेमातील स्टारकास्टपैकी भाग असलेला सनी सिंहच्या वाढदिवसा निमित्ताने प्रभाससह इतर कलाकारांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देवदत्तनेही सनीला शुभेच्छा देणारी पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये या सिनेमाच्या सेटवरील फोटो देवदत्तने शेयर केले आहेत.  ज्यात देवदत्तचा या सिनेमातील भूमिकेचा नवा लुकही पाहायला मिळतोय. शिवाय या फोटोंमध्ये देवदत्तसोबत प्रभास, ओम राऊत, सनी सिंह हे कलाकार दिसत आहेत.


ओम राऊतच्या 'तान्हाजी' सिनेमात देवदत्त महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. आता आदीपुरुषच्या निमित्ताने देवदत्त पुन्हा एकदा या हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेईल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share