By  
on  

सोनाली बेंद्रे कॅन्सरशी झुंज देत असलेल्या हॉस्पिटलमध्येच उपचार घेणार ऋषी कपूर ?

काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी अचानक एक ट्विट केलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी ऋषी कपूर यांची आई कृष्णा राज कपूर यांचं निधन झालं. पण अमेरिकेत स्वत:वर उपचार घेत असलेले ऋषी मात्र आईच्या अंत्यदर्शनासाठी या कारणास्तव भारतात परतू शकले नाहीत. पण सूत्रांनुसार आता एक धक्कादायक बातमी मिळतेय ती म्हणजे, ऋषी कपूरसुध्दा कॅन्सरशी झुंज देत आहेत. न्यूयॉर्क सिटीच्या स्लोन केटरिंगमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून हे तेच हॉस्पिटल आहे जिथे सोनाली बेंद्रे मागील काही महिन्यांपासून उपचार घेत आहे.

कृष्णा राज कपूर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ऋषी कपूर यांच्याबरोबरच पत्नी नितू आणि मुलगा रणबीर कपूरसुध्दा भारतात आले नाहीत. ते ऋषी कपूर यांची काळजी घेण्यासाठी परदेशातच थांबले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या, की नक्की झालंय तरी काय. पण आता एका बॉलिवूड वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 66 वर्षीय ऋषी कपूर यांच्यावर काही दिवस परदेशातच उपचार होणार असून यात केमोथेरीपी आणि रेडीएशनचा समावेश असणार आहे. म्हणूनच स्वत: अशा परिस्थितीत असताना आईचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी त्यांना येता आलं नाही.

भारतातून जाण्यापूर्वी ऋषी कपूर यांनी ट्विट करुनच आपण उपचार घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सर्वांना दिली होती.“मी बॉलिवूडमध्ये गेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ घालवला आहे. येथेच मला तुम्ही भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे माझ्याविषयीची माहिती माझ्या चाहत्यांना मिळावी ही माझी इच्छा. मी काही दिवस वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होत आहे. कोणतीही काळजी करु नका. मी लवकरच भारतात परत येईन. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच.”

Author

Recommended

PeepingMoon Exclusive