By  
on  

कॉफी विथ करणमध्ये झळकणार ही बापलेकीची जोडी

कॉफी विथ करणच्या आगामी सीझनची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. सध्या टीव्हीवर झळकत असलेले करण जोहरचे विविध हटके प्रोमो पाहून तर ही उत्सुकता आणखी शिगेला पोहचलीय. या सीझनमध्ये कोण कोण हजेरी लावणार, कोणासोबत कोण येणार, करण कोणते प्रश्न विचारुन सेलिब्रिटींना भांडावून सोडणार हे जाणून घ्यायची प्रेक्षकांना घाई लागली आहे.

या सीझनमध्ये खुपच इंटरेस्टींग जोड्या उपस्थिती लावणार असल्याचं समजतंय. नुकतंच बॉलिवूड नवाब सैफ अली खान आणि त्याची लाडकी लेक सारा अली खान उपस्तित राहिले होते आणि याची पहिली झलक पाहायला मिळतेय. सारा प्रथमच ऑनस्क्रीन झळकणार असून महत्त्वाचं म्हणजे आपल्या वडीलांसोबत एका टॉक शोला हजेरी लावण्याची संधी मिळतेय. या फोटोत सारा अली खान आणि सैफ अली खानने काऊचवर बसून हातात कॉफी मग पकडल्याचे दिसतायत.

https://www.instagram.com/p/BoeXfyMBXXu/?utm_source=ig_embed

करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो येत्या 21 ऑक्टोबरपासून ऑन-एअर होणार आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना आपल्य आवडत्या सेलिब्रिटींच्या काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्यायला मिळतात. सैफ अली खान आणि सारा अली खान ही बापलेकीची जोडी रिअल लाईफमध्ये कशी हे सांगतीलच, त्याशिवाय साराच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सबद्दल पण जाणून घेता येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive