By  
on  

दिवाळीत पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा जवळपास ब-याच कालावधीपासून टीव्हीपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात त्याच्याबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा ऐकायला मिळाल्या. तसंच तो नुकताच वाईट सवयी सोडवून सुधारणा केंद्रातून परतला आहे. सोशल मिडीयावर त्याने एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात तो म्हणतोय, माझ्या जाडं होण्यामागचं कारण आहे पंजाब, अमृतसर येथील छोले आणि कुलछे आहेत. या फोटोसोबत त्याने कॅप्शन पण दिलंय, मी 5 किलो वजन वाढवलंय.

https://www.instagram.com/p/Boa9pFKBXxW/?utm_source=ig_embed

दरम्यान, लवकरच कपिल शर्मा टीव्हीवर आपल्या कॉमेडी शो घेऊन दमदार पुनरागमन करणार आहे. यात लेटेस्ट अपडेट म्हणजे दिवाळीतच त्याचा हा शो ऑन-एअर होणार असून हा कपिल शर्माचा कोणता नवीन शो असेल की कॉमेडी विथ कपिलचा पुढचा सीझन असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

प्रेक्षकांचा आवडता द कपिल शर्मा शो मागच्या वर्षी बंद झाला. या शोमध्ये लोकप्रिय गुथ्थीची व्यक्तिरेखा साकारणारा सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यातील वादाची ठिणगी हे या शो बंद होण्यामागचं कारण सर्वत्र सांगितलं जात होतं. मग दारू आणि इतर वाईट सवयींमुळे कपिल तणावग्रस्त झाला होता. तो सुधारणा केंदातून परतल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच आलेला फॅमिली टाईम विथ कपिल हा कपिल शर्माचा शो एक ते दोन एपिसोडमध्येच कमी टीआरपीमुळे गुंडाळण्यात आला होता. म्हणूनच कपिलच्या शोची चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनासुध्दा प्रचंड आतुरता लागून राहिली आहे. या नवीन शोमध्ये त्याच्यासोबत सुनील ग्रोव्हरसुध्दा झळकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive