By  
on  

‘माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो ‘ठाकरे’च्या डबिंगला केलीय सुरुवात : नवाजुद्दीन सिध्दीकी

जमलेल्या माझ्या तमाम बंधू -भगिनींनो आणि मातांनो अशा खणखणीत आवाजात डरकाळी फोडत सभा गाजवणारे शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट श्री.बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारा ठाकरे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात हिंदीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकी शिवसेनाप्रमुखांची भूमिका साकारतोय हे आपण जाणतोच.

ठाकरे सिनेमाच्या डंबिंगला नवाजुद्दीनने आता सुरुवात केली असून त्याचा एक फोटो पोस्ट करत त्याने छान मराठीत कॅप्शन देऊन चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. तो म्हणतो, ‘माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो' आजपासून ठाकरेच्या डबिंगलवा सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे नवाजुद्दीन सिध्दीकीला बाळासाहेबांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबत अवघं बॉलिवूडसुध्दा प्रचंड उत्सुक आहे.

खासदार संजय राऊत यांनीच बाळकडू या मराठी सिनेमाच्या यशानंतर शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील या सिनेमाची निर्मिती केली आहे. चार वर्षे या कथेचे  लेखनही संजय राऊत यांनीच केले आहे. अभिजीत पानसे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाचा टीझर उलगडला होता.  बाळासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी २०१९ रोजी ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

https://www.instagram.com/p/BogypTchwJ5/?utm_source=ig_embed

 

बाळासाहेंबाच्या भूमिकेत नावजुद्दीनचा फर्स्ट लूक पाहूनच सर्वत्र त्यांचं प्रचंड कौतुक झालं होतं. सर्वंचजण आपल्या लाडक्या बाळासाहेंबावरील ‘ठाकरे’ या जीवनपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive