अक्षय कुमार ने पूर्ण केले आनंद एल राय यांच्या रक्षाबंधन चित्रपटाचे चित्रीकरण

By  
on  

अक्षय कुमार आणि निर्माता-दिग्दर्शक आनंद एल राय यांनी त्यांच्या आगामी रक्षाबंधन चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत पूर्ण केले आहे.  या वर्षी जूनमध्ये मुंबई परिसरात एका मोठ्या सेटवर चित्रपटाच्या शूटिंग ला सुरवात करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी अक्षय याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान चांदणी चौकातील रस्त्यांवर धावताना दिसला होता, त्याचा हा फोटो बराच व्हायरल झाला होता.

नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून असे कळून आले आहे की, काल रात्री दिल्लीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस होता आणि याच बरोबर चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पूर्ण झाले आहे.  भूमी पेडणेकर अभिनीत हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात चित्रपटगृहात रिलीज होण्यास तयार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

 आनंद एल राय दिग्दर्शित, हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लन द्वारा लिखित, या चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्सच्या सहकार्याने कलर येलो प्रोडक्शंस , ज़ी  स्टडियोज आणि अलका हिरानंदानी यांनी केली आहे.

Recommended

Loading...
Share