By  
on  

पाहा व्हिडीओ: दीपिका आणि रणवीर एकत्र थिरकले 'खलीबली'वर

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हे बॉलिवूड लव्हबर्ड्सची आजकाल बरीच चर्चा रंगते. आता सध्या त्यांच्या लगीनघाईचेच सर्वांना वेध लागले आहेत. पण एखादी पार्टी असो किंवा इव्हेंट, हे बॉलिवूड कपल जणू एक दूजे के लिएच बनल्याप्रमाणे सर्वत्र एकत्रच फिरताना दिसतात. दोघंही नेहमीच आपली फ्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मस्त एन्जॉय करताना दिसून येतात. नुकतंच या दोघांनी हिंदुस्थान टाईम्स लिडरशीप शिखर संमेल्लनात एकत्र उपस्थिती लावली. एकूणच महत्त्वपूर्ण आणि वैचारिक अशा या इव्हेंट दरम्यान दीपिका आणि रणबीरने असं काही केलं ज्यामुळे प्रेक्षक प्रचंड खुश झाले.

तर झालं असं, या संमेल्लनात एका प्रेक्षकाने रणवीर सिंहला डान्स करण्याची विनंती केली. पड्त्या फळाची आज्ञा पाळत रणवीरने डान्स तर केला पण सोबतच दीपिकालासुध्दा आपल्या तालावर थिरकायला भाग पाडलं. मग काय पदमावत   सिनेमातील सुपरहिट खलीबली गाण्यावर डान्स करत दोघांनी धम्माल उडवून दिली. उपस्थितांनीसुध्दा दोघांचा हा डान्स खुप एन्जॉय केला.

https://www.instagram.com/p/Boji8dfB4Dl/?taken-by=ranveersingh

रणवीरनेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाला, हबीबी हे काय सुरु आहे. दीपिका पादुकोण?

या शिखर संमेल्लनात रणवीर दीपिकाने अनेक विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली.

Recommended

PeepingMoon Exclusive