By  
on  

या कारणासाठी सोनम कपूर अहुजाने ट्विटरवरुन काही दिवसांसाठी घेतला ब्रेक

बॉलिवूडची फॅशनिस्टा अभिनेत्री सोनम कपूरने एक निर्णय घेतला ज्यामुळे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. आयुष्यातील लहान-मोठ्या क्षणांचे प्रत्येक अपडेट नेहमीच सोशल मिडीयावर पोस्ट करणा-या सोनम कपूरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काही दिवसांसाठी निरोप घेतला आहे. काही तासांपूर्वीच सोनमने आपला हा निर्णय जाहीर केला.

सोनमने ट्विट करतच सांगितलं की, मी ट्विटरवरुन काही वेळासाठी ब्रेक घेत आहे. इथे खुपच नकारात्मकता येत असल्याने मी हा निर्णय घेतला आहे. सर्वांना माझ्याकडून शांती आणि प्रेम मिळो ही सदिच्छा.

https://twitter.com/sonamakapoor/status/1048455619907207168

सोनम कपूर ही बॉलिवूडच्या त्या सेलिब्रिटींपेकी एक आहे, जी नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असते. परंतु तिने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण तिने असं का केलं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला यामागची पार्श्वभूमी आधी जाणून घ्यावी लागेल.

सोनमने एक ट्विट केलं होतं, “मला शहरात पोहचायला दोन तास लागले. कारण इथे ट्रॅफिक इतकं प्रचंड आहे की, मी अजुनही माझ्या इच्छित स्थळी पोहचू शकलेली नाही. घरातून बाहेर निघणं म्हणजे जणू काही एखादं वाईट स्वप्नंच आहे.”

https://twitter.com/anantvasu/status/1047887995565563907

सोनम कपूरच्या या ट्विटवरुन ट्रोलर्सनी तिला खुप ट्रोल केलं आहे. एक जण म्हणाला, यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. तुम्हाला सार्वजनिक वाहनांचा वापर करायला नको. तुमच्या घरातसुध्दा 10-20 एसी असतात. तुमच्या आरामदायी गाड्यांमुळे प्रचंड इंधन वाया जातं. तुम्हीच ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार आहात.”

तर याच ट्रोलरचा समाचार घेत सोनमने त्याला म्हटलं, "महिला सार्वजनिक वाहनांचा वापर करत नाही, याचं कारण तुमच्यासारखे पुरुष आहेत. त्यांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना छेडछेडीला सामोरं जाण्याची भिती असते."

याच कारणास्तव सोनमने ट्विटरवरुन काही दिवस विश्रांती घेण्याचा हा निर्णय घेतला असावा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive