By  
on  

पाहा व्हिडीओ: न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना दिसले ऋषी कपूर आणि अनुपम खेर

अभिनेते ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच एक ट्विट करत आपण उपचारासाठी परेदशी जात असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. उपचार घेत असलेले ऋषी कपूर ते अर्धवट टाकून आपल्या आईच्या म्हणजे कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाठीसुध्दा भारतात परतु शकले नाहीत. पण नुकतंच ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांचे जुने आणि चांगले मित्र अभिनेते अनुपम खेर छान वेळ घालवताना दिसून आले.

ऋषी कपूर यांनीच ट्विट करत सांगितलं, की मी सध्या कुठलीही चिंता न करता मस्तपैकी माझे जुने मित्र आणि को-स्टार अनुपम खेर यांच्यासोबत न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरण्याचा आनंद घेतोय. ऋषी यांनीच या पोस्टसोबत एक स्लो-मोशन व्हिडीओसुध्दा शेअर केला आहे. यात हे दोघंही अभिनेते न्यूयॉर्कमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसून आले.

भारतातून जाण्यापूर्वी ऋषी कपूर यांनी ट्विट करुनच आपण उपचार घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती सर्वांना दिली होती.“मी बॉलिवूडमध्ये गेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ घालवला आहे. येथेच मला तुम्ही भरभरुन प्रेम दिलं. त्यामुळे माझ्याविषयीची माहिती माझ्या चाहत्यांना मिळावी ही माझी इच्छा. मी काही दिवस वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होत आहे. कोणतीही काळजी करु नका. मी लवकरच भारतात परत येईन. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच.”

https://twitter.com/chintskap/status/1049002011843338240

महत्त्वाचं म्हणजे एका मिडीया रिपोर्टनुसार ऋषी कपूर यांनासुध्दा कॅन्सर झाला असून ते अभिनेत्री सोनाली बेंद्रे ज्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी झुंज देतेय तिथेच उपचार घेत असल्याची माहिती होती. परंतु ऋषी कपूर यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी मात्र या बातम्यांमध्ये सध्या तरी काही तथ्य नसून त्यांच्या काही टेस्ट अजून बाकी असल्याचे सांगितले होते.

दरम्यान एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर, नितू कपूर आणि रणबीर कपूर यांनी या उपचारासाठीच्या वास्तव्यानिमित्त न्यूयॉर्कमध्येच एका अपार्टमेंटमधील फ्लॅट भाड्याने घेतला आहे आणि जेव्हा रणबीरला आपल्या शूटींगसाठी भारतात परतावं लागेल, तेव्हा त्याची बहिण रिध्दीमा कपूर आई-वडिलांसोबत न्यूयॉर्कमध्ये राहणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive