By  
on  

सुशांत सिंह आणि श्रध्दा कपूर आहेत 'छिछोरे',पाहा सिनेमाचा फर्स्ट लूक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि श्रध्दा कपूर यांचा छिछोरा लूक नुकताच समोर आला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारीच्या 'छिछोरे' सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकतंच उलगडलं असून सुशांत आणि श्रध्दा यांचे दोन जबरदस्त लूक पाहायला मिळतायत.
'छिछोरे' सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच श्रध्दा कपूर आणि सुशांत सिंह राजपूत एकत्र काम करत आहेत. 'छिछोरे' या सिनेमाची निर्मिती साजिद नाडीयादवाला करत आहेत. या सिनेमाच्या पोस्टरवर त्याची रिलीज डेटसुध्दा देण्यात आली आहे. पुढील वर्षी 30 ऑगस्ट 2019 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'छिछोरे' या सिनेमाचं हे खुपच मजेशीर असं पोस्टर असून यात सर्वच कलाकार दोन जनरेशनच्या लूक्समध्ये पाहायला मिळतायत. तर ‘कुत्ते की दुम टेढ़ी, टेढ़ी की टेढ़ी’ अशी धम्माल टॅगलाईनसुध्दा देण्यात आली आहे.

 

https://twitter.com/NGEMovies/status/1046404530802503681

काही दिवसांपूर्वीच साजिद नाडीयाडवाला यांनी या सिनेमाच्या सेटवरुनच सिनेमाच्या शूटींगचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली होती. श्रध्दा लवकरच या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात करणार असून सर्वांनाच या सिनेमाच्या कथेबाबच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive