By  
on  

अश्रूंचा बांध फुटला! लेक आर्यनला आर्थर रोड तुरुंगात भेटायला गेला किंग खान

बॉलिवूड बादशाह किंग खानने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठे सपरहिट सिनेमे केले. विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण असा हळवा क्षण त्याच्या सिनेमात कधीच आला नसेल, तसं त्याने प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवलं. क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी कोर्टात सुनावणी झाली आणि त्याचा जामिन अर्ज फेटाळण्यात आला. 

रम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादरम्यान आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता.

करोना काळात जेलमधील कैद्यांना नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नव्हती. पण परिस्थिती सुधारत असल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून नातेवाईकांना परवानगी देण्यात आली आहे.

 

सकाळी ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. त्यावेळी कैद्याला भेटण्यासाटीची नातेवाईकांची सर्व रितसर प्रक्रीया त्याने पूर्ण केली होती. नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला. वळपास १५ ते २० मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांसमोर काहीही भाष्य करण्यास नकार दिला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive