By  
on  

लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप करणा-यांवर आलोक नाथ दाखल करणार अब्रु नुकसानीचा दावा

आता अभिनेते आलोक नाथ यांच्या अडचणीत भरच पडताना दिसून येतेय. विनीता नंदा यांच्यानंतर अभिनेत्री संध्या मृदुल आणि नवनीत निशान यांनीसुध्दा आोलक नाथ यांच्या असभ्य वर्तवणुकीचे दाखले दिले आहेत. पण या संपूर्ण प्रकरणावरची ताजी अपडेट म्हणजे लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप करणा-यांवर बाॉलिवूडचे हे संस्कारी बाबूजी आलोक नाथ अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती त्याचे वकील अशोक साराओगीई यांनी दिली आहे.

तारा या प्रसिध्द मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे 20 वर्षांपूर्वी आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बराच वाद प्रसिध्दी माध्यमातून उफाळला.

संध्या मृदुलनं ट्विट करत तिच्यासोबत आलोक नाथ यांनी केलेल्या गैरवर्तणुकीविरोधात आवाज उठवला आहे. ‘आलोक नाथ यांच्याविषयी मला खूपच आदर होता. या क्षेत्रात तेव्हा मी नवीन होते. ते सेटवर मला मुलीसारखेच वागावायचे. पण अचानक एकदा एका पार्टीदरम्यान रात्री ते मद्यपान करुन माझ्या खोलीत शिरले आणि त्यांनी माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण मग मी ारडोओरडा करायला सुरुवात केल्यावर इतर लोक माझ्या मदतीला धावून आले.

काय होती लेखिका-निर्मात्या विनता नंदाची फेसबुक पोस्ट 

विंटाने लिहलं आहे,“आलोकनाथ यांची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमचा खुप मोठा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही जवळपासच राहत होतो. त्यावेळेस मी दूरदर्शनवरील नंबर वन शो ताराची निर्मिती व लेखनही करत होती. ते माझ्या शोमधील नायिकेमध्ये बरेच इंटरेस्टेड होते, पण ती त्यांना धुडकावून लावत होती. त्यावेळेस ते टीव्हीचे स्टार असल्याने नेहमीच उद्दामपणाने वागत.एकदा त्यांनी त्या नायिकेबरोबर एवढी असभ्य वर्तवणूक केली की तिने त्यांना सर्वांसमोर जोरदार कानाखाली लावून दिली.

विंटा पुढे सांगते, पण मोठा अभिनेता असल्याने आलोकनाथ यांच्या बेताल वागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जायचं. माझ्याबरोबरसुध्दा त्यांनी खुप असभ्य वर्तवणूक केली आहे. एका पार्टीत त्यांनी माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून माझ्यावर बलात्कार केला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive