By  
on  

अभिनेता प्रतिक ब्बबरविरोधात गोव्यात गुन्हा दाखल

अभिनेते व कॉंग्रेस नेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर याच्या विरोधात गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिकच्या कारने एका स्कूटराल जोरदार धडक दिल्याने मोटार कायद्याअंतर्गत त्याच्यावर गोवा पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रतिकने भरधाव वेगात गाडी चालवून स्कूटरला जोरदार धडक दिल्याने स्कूटरचालक तरुण पाओलो कोरिया यात जबर जखमी झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रतिकने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्याच्यासोबत अर्वाच्य भाषेत वाद घातल्याचे सूत्रांकडून समजते. तो तेथील स्थानिक युवक होता.त्याच्या सांगण्यानुसार प्रतिक बेधुंद आणि वन वे मार्गात गाडी चालवत असल्याने हा अपघात घडला.

https://twitter.com/ANI/status/1050123001931403264

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक बबरनेसुध्दा स्कूटरचालकाविरोधात आपल्या कारच्या काचा फोडल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive