By  
on  

नाना पाटेकरांसह चौघांवर गुन्हा दाखल; बुरखा घालून तनुश्री दत्ता पोलिस ठाण्यात

अभिनेत्री तननुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीचा आरोप हे प्रकरण आता  दिवसेंदिवस चिघळतानाच दिसून येतय. 2008 साली नाना पाटेकर यांनी हॉर्न ओके प्लिज सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान माझ्याशी जवळीक करून असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने नानांवर करत बुधवारी पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तनुश्रीची या प्रकरणी जवळपास पाच तास कसून चौकशी केली आणि 40 पानांचे सर्व दस्ताऐवज पाहिल्यांनंतर या चौघांविरोधात हा गुन्हा दाखल केला. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह सिनेमाचे निर्माते सामी सिध्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि कोरियोग्राफर गणेश आचार्य यांचा यात समावेश आहे. तक्रार नोंदविण्यासाठी अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे येताना कोणी आपल्याला ओळखू नये, म्हणून तिने बुरखा परिधान केला होता.

https://twitter.com/ANI/status/1050109287844974592

Author

Recommended

PeepingMoon Exclusive