By  
on  

अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्याबद्दल सांगितलं हे धक्कादायक वृत्त

बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणवणारे आलोक नाथ यांना आता अनेक महिला सहकलाकारांनी गैरवर्तवणुकीच्या आरोपांवरुन घेरले आहे.  प्रसिध्द ‘तारा’ मालिकेच्या लेखिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर अनेक महिला कलाकारांनी आलोक नाथ यांच्या असभ्य वर्तवणुकीचे दाखले दिले.

अभिनेत्री संध्या मृदुल हिने सुध्दा आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलोक नाथ यांच्या गैरवर्तवणुकीमुळे कसा त्रास भोगावा लागला याचा खुलासा केला होता.एका शुटींगदरम्यान त्यांनी दारु पिऊन तिच्या खोलीत धिंगाणा घातला आणि असभ्य वर्तवणुक केली होती. आता विनिता, संध्या आणि दीपिका आमिन यांच्यानंतर आलोक नाथ यांच्यासोबत अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये झळकणा-या त्यांच्या सह-अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी त्यांच्या बेताल वर्तवणुकीबद्दल मौन सोडत एक धक्कादायक उलगडा केला आहे.

एका मुलाखतीत हिमानी शुवपुरी म्हणाल्या,"आलोक नाथ यांचं असभ्य वागणं फारच चुकीचं आहे. ते सेटवर तर निट वागत पण नंतर दारु प्यायल्यावर त्यांचं एकदम रुपच पालटून जायचं. मीसुध्दा त्यांच्या असभ्य वर्तवणुकीबद्दल अनेक अभिनेंत्रीकडून ऐकलंय. मलासुध्दा आधी त्यांच्या वागणुकीबद्दल माहित नव्हतं, पण एकदा एका पुरस्कार सोहळ्यादम्यान आम्ही एकाच विमानातून प्रवास करत होतो. सोबत त्यांची पत्नीसुध्दा होती. ते दारु प्यायल्याने अगदीच विचित्र आणि बेताल वागत होते. यामुळे त्यांची पत्नीसुध्दा बरीच चिंतेत दिसत होती. फ्लाईटमध्येच ते मूत्रविसर्जन करु लागले. त्यांच्या या असभ्य वागण्यामुळे त्यांना फ्लाईटमधून उतरवण्यात आले.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive