दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्राने केलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीच्या आरोपानंतर सुपरस्टार अक्षय कुमारने नाना पाटेकर व साजिद खान यांच्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत ‘हाऊसफुल 4’ सिनेमाचं चित्रिकरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, आता या सिनेमातील अन्य कलाकारांनीदेखील अक्षयसारखीच ठोस भूमिका घ्यावी असं आवाहान अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नानं यापूर्वी केलं होतं.
अभिनेता रितेश देशमुख हासुध्दा ‘हाऊसफुल 4’ या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतोय त्यानेसुध्दा आपलं मौन सोडत याप्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे. ट्विटरवर रितेश म्हणाला, “या सर्व महिलांच्या व्यथा ऐकून मी स्तब्ध झालो आहे. या क्षेत्रातील किती सा-या महिलांना लैंगिक शोषणाचं शिकार व्हावं लागलं आणि ही किती मोठी धाडसाची गोष्ट आहे की, त्या स्वत: पुढे येऊन याबाबत आवाज उठवतायत. या प्रकरणात सर्वांचं म्हणणं आधी ऐकून घेतलं पाहीजे,उगीचंच मत बनवायला नको. अक्षय कुमार यांनी चित्रिकरण थांबविण्याच्या घेतलेल्या निर्णयाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. या प्रकरणाचा तपास व्हायलाच हवा.”
https://twitter.com/Riteishd/status/1050732353516068864
साजिद खानवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर त्याच्यावर चहुबाजुंनी टीका होतेय. साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्राने केलेल्या आरोपानंतर काही महिलांनी #MeToo मोहिमेत सहभागी होत छळाचा आरोप केलाय.अक्षयच्या निर्णयानंतर साजिद स्वत: दिग्दर्शन पदावरून स्वत:च बाजूला झाला. तसेच माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत असंही तो ट्विट करून म्हणाला होता.