By  
on  

आलोक नाथ यांच्या पत्नीने विनता नंदा यांच्याविरोधात दाखल केला मानहानीचा दावा

बॉलिवूडचे संस्कारी बाबूजीं विरोधात विनता नंदा हिने केलेल्या बलात्काराच्या आरोपाविरोधात आलोक नाथ यांच्या पत्नीने अंबोली पोलिस ठाण्यात मानहानीचा दावा दाखल केला आहे. आलोक नाथ यांच्या मते त्यांना जाणूनबून या प्रकरणात गोवलं जात आहे. आलोक नाथ अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती त्याचे वकील अशोक साराओगीई यांनी कालच दिली होती. त्यानंतर आज आलोक नाथ यांच्या पत्नीने हे पाऊल उचललं.

तारा या प्रसिध्द मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे 20 वर्षांपूर्वी आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा वाद प्रसिध्दी माध्यमातून बराच उफाळला. आलोक नाथ यांच्यासोबत काम करणा-या अनेक महिला अभिनेत्रींनी आलोक नाथ यांच्यावर विनताने केलेल्या आरोपांना आपल्यासोबतही असा अनुभव आल्याचे म्हणत दुजोरा दिला. संध्या मृदुल, दीपिका आमिन आणि रेणूका शहाणे व हिमानी शिवपुरी यांच्या व्यक्त होण्यानंतर आलोक नाथ यांच्याकडे संशयाची सुई दिसतेय.

दरम्यान आंबोली पोलिसांनी आलोक नाथ यांच्या पत्नीची तक्रार स्विकार केली असून या तक्रारीत त्यांनी विनीता नंदा यांच्याकडे जर अशा प्रकारची घटना घडली असेल, तर कोणता सबळ पुरावा आहे, याची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

काय होती लेखिका-निर्मात्या विनता नंदाची फेसबुक पोस्ट 

विंटाने लिहलं आहे,“आलोकनाथ यांची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमचा खुप मोठा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही जवळपासच राहत होतो. त्यावेळेस मी दूरदर्शनवरील नंबर वन शो ताराची निर्मिती व लेखनही करत होती. ते माझ्या शोमधील नायिकेमध्ये बरेच इंटरेस्टेड होते, पण ती त्यांना धुडकावून लावत होती. त्यावेळेस ते टीव्हीचे स्टार असल्याने नेहमीच उद्दामपणाने वागत.एकदा त्यांनी त्या नायिकेबरोबर एवढी असभ्य वर्तवणूक केली की तिने त्यांना सर्वांसमोर जोरदार कानाखाली लावून दिली.

विंटा पुढे सांगते, पण मोठा अभिनेता असल्याने आलोकनाथ यांच्या बेताल वागण्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जायचं. माझ्याबरोबरसुध्दा त्यांनी खुप असभ्य वर्तवणूक केली आहे. एका पार्टीत त्यांनी माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून माझ्यावर बलात्कार केला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive