By  
on  

आलोक नाथांचे CINTAA च्या नोटीसला उत्तर; सर्व आरोप फेटाळले

बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी म्हणवणारे अभिनेते आलोक नाथ यांच्याविरोधात लेखिका-निर्मात्या विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर आणखी दोन ते तीन अभिनेत्रींनी त्यांच्या लैंगिक वर्तवणुकीचे दाखले दिले. या संपूर्ण प्रकारानंतर आलोक नाथ यांनी शनिवारी विनता नंदा यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार आलोक नाथ यांचे वकील अशोक सारागोगी यांनी सिंटा (CINTAA) ने त्यांना पाठवलेल्या नोटीसचे उत्तर दिले आहे. आलोक नाथ यांनी या नोटीसला पाठविलेल्या उत्तरात आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हे आरोप निराधार असल्याचंही म्हटलंय.

तारा या प्रसिध्द मालिकेच्या लेखिका आणि निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टद्वारे 20 वर्षांपूर्वी अभिनेते आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हा वाद प्रसिध्दी माध्यमातून बराच उफाळला. आलोक नाथ यांच्यासोबत काम करणा-या अनेक महिला अभिनेत्रींनी आलोक नाथ यांच्यावर विनताने केलेल्या आरोपांना दुजोरा देत आपल्यालाही असा अनुभव आल्याचे म्हटले. संध्या मृदुल, दीपिका आमिन, रेणूका शहाणे व हिमानी शिवपुरी यांच्या आलोक नाथ यांच्या गैरवर्तवणुकीबाबत व्यक्त होण्यानंतर आलोक नाथ यांच्याकडे संशयाची सुई दिसतेय.

https://twitter.com/ANI/status/1051695339567243271

आलोक नाथ अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती त्याचे वकील अशोक सारागोई यांनी दिली होती. त्यानंतर आलोक नाथ यांच्या पत्नीने अंबोली पोलिस ठाण्यात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.

Recommended

PeepingMoon Exclusive