By  
on  

हा आहे प्रभासचा आगामी सिनेमा, पाहा फर्स्ट लूक पोस्टर

बाहुबली फेम अभिनेता प्रभास याला त्याच्या वाढदिवसा आधीच एक खास गिफ्ट मिळालं आहे. प्रभासचा आगामी सिनेमा  'शेड्स ऑफ साहो' चा फर्स्ट लूक नुकताच उलगडला आहे. या पोस्टरवर प्रभासचा एक शानदार आणि स्टायलिश अंदाज दिसतोय. येत्या 23 ऑक्टोबरला प्रभासचा वाढदिवस असून निर्मात्यांकडून त्याला ही भेट मिळालीय.

'शेड्स ऑफ साहो' सिनेमाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ उद्या त्याच्या वाढिवसानिमित्त प्रदर्शित होणार आहे. रेकॉर्ड-ब्रेकिंग 1500 करोड चा सिनेमा बाहुबली: द कॉनक्ल्युजन नंतर जवळपास दीड वर्षानंतर त्याचा हा सिनेमा येत असल्याने चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

या बिग बजेट सिनेमात प्रभाससोबतच  बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत असून हिदींसोबतच हा सिनेमा तेलुगू, तमिळमध्ये डब होणार आहे.

या सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासुध्दा महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

गुलशन कुमार टी-सीरीज़ आणि भूषण कुमार और यूव्ही क्रिएशन प्रोडक्शन  प्रस्तुत "साहो" सुजीत दिग्दर्शित करत आहेत.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive