By  
on  

शाहरुखने फॅमिली आणि फॅन्ससोबत असा साजरा केला वाढदिवस

आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा बादशाह शाहरुख खानचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्याचे देश-विदेशातील हजारो चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. एखाद्या सणासारखाच उत्साह आणि वातावरण या दिवशी त्याच्या घरात आणि घराबाहेर पाहायला मिळतं. शाहरुखच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर गर्दी करायला सुरुवात केली. मग किंग खानसुध्दा चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी घराबाहेर आला, तेव्हा चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

शाहरुखच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपूर्वीपासूनचजमायला आणि आपल्या लाडक्या बादशाहला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

https://www.instagram.com/p/BppjEmYF2lT/

हजारो-लाखो चाहत्यांकडून शुभेच्छांचा स्विकार करताना आणि अभिवादन करताना किंग खान

https://www.instagram.com/p/BpphjP9FfwL/

शाहरुखने पत्नी गौरीला केक भरवत वाढदिवस साजरा केला आणि घराबाहेर जमलेल्या चाहत्यांचे भरभरुन देणा-या प्रेमासाठी खुप खुप आभार मानले.

https://twitter.com/iamsrk/status/1058101291552067584

शाहरुख आणि गौरीला सर्वात जास्त ओळखणारा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सर्वात पहिल्या शुभेच्छा दिल्या आहेत. हॅप्पी बर्थ डे मेरे भाई असं म्हणत करण म्हणतो, तु आणि गौरी माझ्यासाठी सर्वकाही आहात. तुमच्यासोबतचं माझं नातं आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण नात्यांपैकी एक आहे. तुम्ही माझं कुटुंब आहात. मला खुप सा-या अविस्मरणीय आठवणी देण्यासाठी धन्यवाद. आशा करतो, तुझी झिरो फिल्म ब्लॉकब्लस्टरच होईल.

https://www.instagram.com/p/BppfdqnD1j8/

सर्वांना आता शाहरुखच्या झिरो सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. आज किंग खानच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याच्या झिरोचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive