By  
on  

शाहरुख खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळाली 'झिरो' ट्रेलरची भेट

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा 'झिरो' ट्रेलर आज प्रदर्शित करुन त्यानेच चाहत्यांना आपल्या वाढदिवसाचं खास भेट दिली आहे. शाहरुखसोबतच या सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ या दोन अभिनेत्री नायिका म्हणून झळकणार आहे.  कालच वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला  शाहरुखनं या सिनेमाचे दोन महत्त्वाचे पोस्टर शेअर केले आहेत. हे पोस्टर शाहरुखच्या या सिनेमाबाबत अधिक कुतूहल चाहत्यांच्या मनात निर्माण करतंय.

चला, तर या 'झिरो' ट्रेलरमध्ये नक्की काय आहे ते जाणून घेऊया

शाहरुख खान बहुअा सिंगच्या व्यक्तिरेखेत या ट्रेलरच्या सुरुवातीला पाहायला मिळतो. तो मेरठहून दिल्लीत एका मुलीच्या शोधात आला आहे. पहिल्यांदा त्याला अनुष्का शर्मा साकारत असलेल्या व्यक्तिरेखेसोबत प्रेम होतं तर नंतर कतरिना कैफ साकारत असलेल्या व्यक्तिरेखेसोबत प्रेम होतं. या तिघांचा लव्ह ट्रॅंगल सिनेमात पाहायला मिळणार असून सर्वांनाच या कथानकाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

https://youtu.be/Ru4lEmhHTF4

Recommended

PeepingMoon Exclusive