गायक सोनू निगमसह पत्नी व मुलालासुध्दा करोनाची लागण

By  
on  

करोना विषाणूने पुन्हा आपलं थैमान सुरु केलं आहे. राज्यासह देशभरात करोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अनेक बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आपल्या सुमधूर आवाजाने गेली अनेक वर्ष रसिकांना मंत्रमुग्ध करणारा प्रसिध्द गायक सोनू निगमचं संपूर्ण कुटुंबच करोनाच्या विळख्यात अडकलं आहे. सोशल मिडीयावरुनच त्याने ही माहिती दिली

 सोनू निगमसोबत त्यांचा मुलगा निवान निगम, पत्नी मधुरिमा निगम यांनाही करोना झाला आहे.सोनू निगम सध्या दुबईमध्ये असून तिथेच त्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Recommended

Loading...
Share