विकी-कतरिनानंतर फरहान अख्तर या मराठमोळ्या मॉडेलसह चढणार बोहल्यावर?

By  
on  

बॉलिवूडमधलं सर्वात चर्चित कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या शाही लग्नाची अजूनही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या विवाहसोहळ्यानंतर आता बॉलिवूडमधलं आणखी एक कपल बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा रंगलीय. अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चांनंतर आता आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे. ते म्हणजे शिबानी आणि फरहान लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे दोघं नेहमीच एकत्र हिंडताना स्पॉट होतात. कधी तर परदेशातही हया जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळते.

बॉलिवूड लाइफ’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी मार्च महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी मुंबईत मार्च महिन्यात लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण करोनाचा वाढता प्रभाव आणि बॉलिवूड कलाकरांना होणारा करोनाचा संसर्ग पाहाता त्यांनी लग्न खासगी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. 

. शिबानीसोबत फरहानच्या मुलाचं ट्युनिंग छान जुळत असल्याने लवकरच ते पुढचं पाऊल उचलणार असल्याचे समजते. गेल्या ३-४ वर्षांपासून हे दोघं एकत्र आहेत. 

फरहान अख्तरने 2017 साली पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत.

Recommended

Loading...
Share