By  
on  

मलायकाच्या गर्ल गॅंगमध्ये सामिल झाला अर्जुन कपूर, दिसला रोमॅंटिक अंदाज

अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये व मिडीयामध्ये चवीचवीने चघळल्या जातात याची तुम्हाला कल्पना असेलच. अरबाज व मलायकाचा घटस्फोट झाल्यापासून अर्जुनसोबतचं मलायकाचं नातं कोणतं नवं वळण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आधी लपून-छपून भेटणारे आणि मिडीयाला टाळणारे मलायका –अर्जुन आता मात्र बिनधास्त एकमेकांसोबत फिरू लागले आहेत.

मलायकाच्या गर्ल गँगमध्ये अर्जुनचा समावेश झाला आहे. अर्जुन मलायकाच्या गर्ल्ससोबत दिसला. त्यांच्या या पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत मलायका व अर्जुन अगदी एकमेकांच्या जवळ बसलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, हा फोटो महीप कपूरने शेअर केला आहे. महिप ही अर्जुनचे काका संजय कपूरची पत्नी आहे. म्हणजे नात्याने अर्जुनची काकू आहे. फोटोत करिना कपूर, अमृता अरोरा, सोफिया चौधरी असे अनेकजण दिसून येतायत आहेत. सर्वांचाच पार्टी मोड ऑन दिसतोय.

https://www.instagram.com/p/BqNmFtYBHHl/

मलायका-अर्जुनचं हे प्रकरण सध्या चर्चेत असतानाच मलायकाचा पती अरबाजसुध्दा विदेशी जॉर्जिया अंद्रियानीला डेट करतोय. त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये असं झालंय ते म्हणजे, ऐकावे नवलच!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive