By  
on  

शाहरुखच्या अबरामने बिग बींना विचारला हा निरागस सवाल

 बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा लाडका मुलगा अबराम हा सर्वात टॉप स्टार किडपैकी एक आहे. अबराम लहान असल्याने नुकताच त्याने एक गोड आणि निरागस असा गैरसमज करुन घेतला आहे. आपण सामान्य लोक कसे पडद्यावर जी नाती आणि श्रणानुबंध पाहोत ती क्षणार्धासाठी खरी मानतो. पण सिनेमा किंवा मालिका संपली की आपल्याला भान येतं, अरेच्चा ही तर फक्त पडद्यारची नाती आहेत. पण लहान मुलाचं तसं नसतं त्यांना जे दिसतं ते तसंच वाटतं.

बिग बी अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या बच्चन हिचा वाढदिवस 16 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रिटी किड्स उपस्थित होते. आराध्याच्या या वाढदिवसाच्या पार्टीला अबरामलासुध्दा निमंत्रण होतं. पण गंमतीची गोष्ट म्हणजे अबराम बिग बींना शाहरुखचे वडील समजत असून ते आपल्यासोबत का राहात नाहीत असा लाडिक सवालसुद्धा त्याने केल्याचं खुद्द बिग बींनीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरु फोटो शेअर करत सांगितलंय. अबरामचा किती हा निरागसपणा त्याची समजूत आता कशी काढायची. त्याला बिचा-याला वाटतंय बिग बी आपले आजोबा आहेत आणि तरीही ते आपल्यासोबत राहत नाहीत, त्याला सारखा हाच सवाल सतावतोय.

https://www.instagram.com/p/BqUBrUJBc8Q/

अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अबराम आणि श्वेता नंदा दिसून येत आहे.

दरम्यान, अमिताभ आणि शाहरुख यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केल्याने अबरामची बिग बी हे आपले आजोबा आहेत अशी गोड समजूत झालीय. पण अबरामला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता शाहरुख कसं देणार हेसुध्दा पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive