“असे १०० सलमान गल्ली झाडायला…”, अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घराबाहेर पडताच संतापला

By  
on  

अभिजित बिचुकले या अतरंगी स्पर्धकाने बिग बॉस मराठीच्या 2 -या सीझनमध्ये बराच धुमाकूळ घातला होता. घरात सतत चर्चेत असणा-या बिचुकलेला कुठल्यातरी प्रकरणात बिग बॉसच्या घरातूनच अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हिंदी बिग बॉसच्या १५ मध्ये सहभागी झालेले अभिजित बिचुकले आपल्या वादग्रस्त वक्तव्यं आणि इतर सदस्यांमुळे नेहमी चर्चेत राहिले. बिग बॉस १५ च्या घरातून नुकतेच बिचुकले घराबाहेर पडले. यानंतर एका न्यूज चॅनलला मुलाकत देताना त्यांनी या कार्यक्रमाचा होस्ट सुपरस्टार सलमान खानवर टीकेची झोड उठवली आहे. 

गल्ली झाडायला १०० सलमान उभे करेन असं म्हटलं आहे. सलमान खानला कोणी मोठं झालेलं पहावत नाही असा आरोपही बिचुकले याने संतापून केला आहे. 

Recommended

Loading...
Share