By  
on  

'तैमूर बाहुला' पाहून अशी दिली सैफ-करिनाने प्रतिक्रिया

सैफ अली खान आणि करिना कपूरचा लाडका नवाब तैमूर याचा बाहुला केरळच्या मार्केटमध्ये आल्यानंतर सोशल मिडीयावर चर्चेला एकच उधाण आलं. जिथे तिथे तैमूर बाहुल्याचीच चर्चा होती. एका स्टार किडला सेलिब्रिटींपेक्षा जास्त वलय प्राप्त होऊ शकतं हे तैमूरने सर्वांसमोर सिध्द करुन दाखवलं. पण महत्त्वाचं म्हणजे यावर करिना आणि सैफ कशी प्रतिक्रीया देतील हे जाणून घेण्याची बरीच उत्सुकता होती.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला,“मला असं वाटतं की, मी तैमूरच्या नावाचा ट्रेडमार्कच बनवायला हवा. मला आनंद आहे की, त्याच्यामुळे लोकांना फायदा होतोय. या बदल्यात मी देवाकडे फक्त तैमूरसाठी त्याची सुरक्षा आणि आनंदाची मनोकामना करतो.”

सैफ असं म्हणत असताना करिनानेसुध्दा यावर आपली प्रतिक्रिया दिली, ती म्हणते,“तैमूर आपल्या प्रसिध्दीपासून दूर जाऊ शकतो, ना त्याचे आई-वडील. जेव्हा मी ते खेळणं पाहिलं माझ्याकडे शब्दच नव्हते. तेव्हा सैफ मला म्हणाला, हे सर्व तैमूरवरच्या प्रेमापोटी आहे. त्याच्यासाठी हा आशिर्वादच आहे. म्हणूनच त्याचे फोटो क्लिक करण्याच्या किंवा त्याच्या खेळण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींवर आपण निर्बंध लादणं योग्य ठरणार नाही. पण लोकांनी हेही लक्षात घ्यायला हवं की,तो फक्त दोन वर्षांचा एक मुलगा आहे व एक सामान्य आयुष्य जगणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे.”

तैमुरच्या एका फोटोसाठी फोटोग्राफर्स १५०० रुपये आकारतात असं खुद्द सैफ अली खानने सांगितलं आहे.सैफने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive