By  
on  

'द फेम गेम' मधून माधुरी दीक्षितचं वेबसिरीजमध्ये पदार्पण

धकधक गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली माधुरी दीक्षितने आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. टेलिव्हिजनवर विविध डान्स रिएलिटी कार्यक्रमांमधूनही माधुरी पाहायला मिळाली. मात्र सध्याच्या ओटीटीविश्वात माधुरी कधी झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. तेव्हा चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असून माधुरी दीक्षित नेने लवकरच ओटीटीवर झळकणार आहे.

'द फेम गेम' या वेबसिरीजमधून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या वेबसिरीजमधून माधुरी पहिल्यांदाच वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'फाईंडींग अनामिका' असं या वेबसिरीजं नाव होतं. मात्र ते नाव बदलून आता द फेम गेम या नावाने ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिरीजचा पहिला वहीला पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. माधुरीने सोशल मिडीयावर पोस्टर पोस्ट करत चाहत्यांना या सिरीजची बातमी दिलीय. 

 

बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली दिग्दर्शित ही सिरीज एक सस्पेन्स सिरीज असेल. या सिरीजमध्ये माधुरी एका बॉलीवुड स्टारच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिरीजमध्ये माधुरी अनामिका आनंदच्या भूमिकेत झळकणार असून तिच्या आयुष्यावर ही सिरीज बेतलेली आहे. एका बॉलीवुड स्टारचं आयुष्य कसं असतं हे या सिरीजमधून समोर येईल. येत्या 25 फेब्रुवारी रोजी माधुरीची ही पहिली वहिली सिरीज नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. माधुरीसह या सिरीजमध्ये संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुळ्ये, लक्ष्यवीर सरन हे कलाकार झळकतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive