By  
on  

अक्षय कुमार आणि शाहरुख खानचा असा दिसला दोस्ताना

शाहरुख खान आणि अक्षय कुमार हे बॉलिवूडचे असे दोन सुपरस्टार आहेत की, जे कधीच आपली मैत्री जगजाहीर  करत नसले तरी त्यांच्यातील एक बॉडींग नेहमीच दिसून येतं. ब-याच कमी जणांना त्यांचा सोशल मिडीयावरील बातचितचा किस्सा माहित पडला असेल.

तर त्याचं झालं असं की,किंग खानच्या वाढदिवसानिमित्त खिलाडीकुमारने त्याला एका खास अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. त्यासोबतच झिरो सिनेमासाठी त्याला ऑल द बेस्टही केलं होतं. अक्षयनं लिहलं होतं, "प्रिय शाहरुख तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, पण आणखी एक आवर्जून सांगायचं म्हणजे आधीच अभिनंदन करतोय ते तुझ्या ‘झीरो’ सिनेमासाठी. खुपच अप्रतिम सिनेमा असणार हा, मी त्याचा ट्रेलर पाहिला हा सिनेमा  ब्लॉकब्लस्टरच असणार. मी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतोय."

अक्षयच्या या खास शुभेच्छांना शाहरुखने मनापासून धन्यवाद देत पुन्हा एक मेसेज उत्तराखातर लिहला, "अक्षय तुझ्या शुभेच्छांसाठी खुप खुप आभार. तुझ्या अप्रूव्हलचं शिक्कामोर्तब म्हणजे आमच्यासाठी जणू अवघ्या जगाचीच ही प्रतिक्रिया आहे. माझ्यातर्फे तुला '2.0' च्या यशासठी खुप सा-या शुभेच्छा. सिनेमातील तुझा लुक अविश्वसनीय आहे."

यावरुनच या दोन बड्या सुपरस्टारच्या मैत्रीची झलक पाहायला मिळतेय. फक्त इतकंच नाही तर या विकेंडला झीरोच्या प्रोमोशनमधून वेळात वेळ काढून अक्षय कुमारचा '2.0' सिनेमा पाहणार आहे. तर अक्षयसुध्दा यावर्षा अखेरीस कुटुंबासोबत नेहमीचे हॉलिडेज असे प्लॅन करणार आहे की, तो 'झीरो' सिनेमा  पाहू शकेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive