By  
on  

भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी शाहरुख खानची उपस्थिती

आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर आज दादर, शिवाजीपार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी अनेक कलाकार मंडळींनी शिवाजी पार्कात लतादीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. 

अभिनेता शाहरुख खानही शिवाजी पार्क येथे दाखल झाला आहे. शाहरुखच्या अनेक चित्रपटात लता दीदींची आवाजातील सुरेल गाणी ऐकायला मिळाली आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive