By  
on  

अक्षय कुमार म्हणतो,'मी आणि रजनी सर सेटवर मराठीतच बोलायचो'

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार, थलायवा रजनीकांत हे दोन अभिनयसम्राट 2.O  सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येत आहेत. या दोघांची ऑनस्क्रीन अभिनयाची जुगलबंदी पाहणं सिनेरसिकांसाठी जणू एक पर्वणीच आहे, असंच म्हणावं लागेल.

2.O सिनेमाच्या प्रोमोशनदरम्यान अक्षय कुमारला रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी विचारण्यात आलं, तेव्हा तो फार उत्साहाने म्हणाला, “ साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणेच रजनीकांत हे व्यक्तिमत्त्व आहे. ते खुपच शांत आणि नम्र स्वभाचे आहेत. रजनीकांत सर हे मूळचे महाराष्ट्रीयन आणि मी पक्का मुंबईकर असल्याने मला मराठी येतं, त्यामुळे आम्ही दोघंही नेहमी सेटवर मराठीतच छान गप्पा मारायचो. ते जसे आहेत तसेच ते नेहमी तुमच्यासमोर येतात, त्यांना खोटा देखावा करण्याची अजिबातच सवय नाही. इतके मोठे सुपरस्टार असले तरी त्यांच्या चेह-यावर गर्वाचा एक लवलेशही नसतो. मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं याचा मला अत्यंत आनंद होत आहे.”

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्यासोबतच या सिनेमात अभिनेत्री अमी जॅक्सनसुध्दा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. बहुप्रतिक्षीत आशिया खंडातील सर्वात बिग बजेट ‘2.0’ हा सिनेमा 29 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.’

https://youtu.be/_qOl_7qfPOM

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive