By  
on  

शाहरुख खानच्या त्या कृतीवर बोट दाखवणा-यांना उर्मिला मातोंडकरने दिलं प्रत्युत्तर

 आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत.  पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता दीदींना शासकीय इतामामात मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारही करण्यात आले.  मोठ्या जड अंत:करणाने दीदींना चाहत्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचा सुरेल स्वर अजरामर राहील, हे मात्र नक्की

92 वर्षीय लतादीदींना अखेरचा दंडवत देण्यासाठी क्रीडा, राजकारण, सिनेमा या सर्वच क्षेत्रातून मान्यवरमंडळी रविवारी शिवाजी पार्कवर उपस्थित होती.देशाचं नाव जगभरात उज्वल करणा-या लाडक्या दीदींना सर्वांनी भावपूर्ण निरोप दिला. .सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. अवघा देश दीदींच्या जाण्याने शोकसागरात बुडाला आहे. दीदींच्या अंत्यदर्शन घेतानाचे राजकारणी, सेलिब्रिटी आदींचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत आहेत. त्यापैकी बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शाहरुख खानने वाहिलेल्या श्रध्दांजलीवर अनेक नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसतायत. 

शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दोघेही लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र स्टेजवर चढले होते. मॅनेजर पूजा ददलानी हात जोडून तिथे उभ्या राहिल्या, तर शाहरुख खानने प्रथम तिथे उभे राहून प्रार्थना केली, त्यानंतर मास्क खाली सरकवून त्याने खाली वाकून पार्थिव शरीरावर फुंकर मारली. यानंतर शाहरुख खान पूजा ददलानीसोबत हात जोडून शरीराची प्रदक्षिणा करून स्टेजवरून खाली उतरला.

शाहरुखच्या या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शाहरुख लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. हजारोंच्या गर्दीत अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या पार्थिवावर थुंकणे कसे शक्य आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. खरंतर किंगखानने ती दुवा मागितली आहे. 

शाहरुखला या प्रकारावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सडेतोड उत्तर दिलं हे. पंतप्रधानांकडून काहीतरी शिकायला हवे होते, असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. याला थुंकणे म्हणतात का? असे ट्विट करत एका युजरने शाहरुखचा फोटो पोस्ट केला आहे. 

 

“याला थुंकणे नाही, फुंकणे म्हणतात. या सभ्यतेला, संस्कृतीला भारत म्हणतात. पंतप्रधानांचा फोटो लावला आहे, त्यांच्याकडून काहीतरी शिकायला हवे होते. भारत मातेच्या मुलीचे गाणे ऐका ‘ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सन्मति दे भगवान, सारा जग तेरी सन्तान.’ आजचा दिवस तरी सोडायचा होता,” असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हणत मनं जिकली आहेत. 

 

तर दुसरीकडे शाहरुखच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive