By  
on  

सलमान खान म्हणतो, ''आईच्या मांडीवर आहे... स्वर्ग''

सुपरस्टार सलमान खानच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा होताना दिसते. सलमान भाईजान सोशल मिडीयावरसुध्दा ब-यापैकी सक्रीय असतो. सलमाननं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषतः या फोटोला सलमाननं दिलेलं कॅप्शन चाहत्यांना प्रचंड भावतंय. तुम्हा आम्हा सर्वसामान्यांसारखाच तोसुध्दा आपल्या आईच्या खुप जवळ आहे. 

सलमान खान आणि त्याची आई सलमा खान या दोघांमध्ये किती प्रेम आहे हे अनेकदा त्यांच्या पोस्टवरुन पाहायला मिळालं आहे. दबंग खानने अनेकदा आईसोबत काही शोमध्ये हजेरीसुध्दा लावलीय आणि आईने त्याच्या खट्याळखोड्या टेलिव्हिजनवर प्रेक्षकांसमोर आणल्या, 

 

इन्स्टाग्रामवर आईसोबतचा सेल्फी शेअर करताना त्याला दिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सलमाननं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आईच्या मांडीवर… स्वर्ग’ सलमानच्या या पोस्टचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत असून चाहत्यांना त्याचा हा सेल्फी प्रचंड भावला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive