By  
on  

रजनीकांतच्या चाहत्यांचा उत्सव; असं प्रेम तुम्ही कधीच पाहिलं नसेल

दाक्षिणात्य सुपरस्टार,थलायवा रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांचा 2.0 सिनेमा आज 29 नोव्हेंबर रोजी देशभरात प्रदर्शित झाला रजनीकांतच्या प्रत्येक सिनेमासाऱखा या सिनेमाचा ही पहिला मॉर्निंग शो सकाळी 6 वाजता ठेवण्यात आला आणि रजनी चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा करत हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले. तर इतर काही ठिकाणी पूजा व होम-हवन करत सिनेमाचं स्वागत करण्यात आलं.

शंकर दिग्दर्शित आशियातील सर्वात बिग बजेट सिनेमा 2.O हा सायन्स-फिक्शन सिनेमाद्वारे मोबाईलचे मानवी आयुष्यावर व पर्यावरणावर होणारे हानिकारक दुष्परिणाम दाखविण्यात आले आहेत.

https://twitter.com/CompleteCinemas/status/1067951912442507264

 

रजनीकांतच्या चाहत्यांनी या सिनेमाच्या निमित्ताने जणू पुन्हा दिवाळीच साजरी केली.

https://twitter.com/rahulnath134/status/1067986934008442880

अनेक सिनेमागृहात थलायवा रजनीकांत याचं नाव पडद्यावर दिसताच क्षणी जोरजोरात शि्टट्या आणि आनंदाला उधाण आलं होतं.

https://twitter.com/baelal23/status/1067966730532765697

सकाळचे सर्वच शो हाऊसफुल्ल होते. सिनेमापाहून आल्यानंतर प्रत्येकाच्या चेह-यावर समाधान आणि असा सिनेमा यापूर्वी कधीच पाहिला नाही असे भाव़ होते.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive