By  
on  

Video : इलेक्ट्रिशियन म्हणून घरात घुसला अन्, धक धक गर्ल माधुरीने सांगितला किस्सा

सौंदर्यसम्राज्ञी आणि अभिनयसम्राज्ञी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने भारतीय सिनेमात खुप मोठं योगदान दिलं आहे. ती एक सर्वगुणसंपन्न अभिनेत्री असून तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. माधुरी दीक्षित ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणं ती पसंत करते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात. 

माधुरीचा नुकताच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांची लवकरच ‘द फेम गेम’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी संजय कपूर आणि माधुरीने ‘राजा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता जवळपास २७ वर्षांनंतर ते पुन्हा या सीरिजमध्ये दिसणार आहेत. या सीरिजच्या प्रमोशनसाठी माधुरी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये उपस्थित होती.

त्यावेळी माधुरी म्हणाली, ‘एकदा माझ्या घरातला स्विच बोर्ड खराब झाला होता. तो ठीक करण्यासाठी जवळपास चार लोक माझ्या घरी आले होते. एकजण बोर्ड ठिक करत होते, दोघे त्याला मदत करत होते. जेव्हा स्विच बोर्ड ठिक झाला तेव्हा तीन लोक परत गेले आणि चौथा व्यक्ती तिथेच थांबला. मी त्याला विचारले तू त्यांच्यासोबत जात नाहीस का? त्यावर तो म्हणाला मी त्यांच्यासोबत आलेलो नाही. तुम्हाला पाहण्यासाठी मी आलो होतो.’

हा किस्सा ऐकून कपिल शर्मा शोमध्ये सगळेच खळखळून हसू लागले. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive