By  
on  

देशभक्तीची नवी परिभाषा उलगडणार 'उरी', पाहा ट्रेलर

देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या 'उरी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आदित्य धर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

यात विकी कौशल आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहेत. सर्जिकल स्ट्राईक मोहिमेतील बारकावे सिनेमाच्या माध्यमातून पडद्यावर दाखवण्याचा दिग्दर्शकाचा मानस आहे. अभिनेता विकी कौशलने त्याच्या ट्विटर हँडलवर उरीचा ट्रेलर शेअर केला आहे. 'पिपिंगमून'शी खास बातचीत करताना तो म्हणतो, उरीमधील कमांडर इन चीफची भूमिका साकारण्यासाठी मला कठोर मेहनत घ्यावी लागली. रोज सलग 5 तास ट्रेनिंग सोबतच स्ट्रिकट डाएट ही फॉलो करावं लागलं.

18 सप्टेंबर 2016मध्ये भारतीय सैन्याच्या उरी येथील तळावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. ही चकमक जवळपास सहा तास चालली होती. यात आपले 17 जवान शहीद झाले होते. तर सहा तासानंतर जवळपास सगळे अतिरेकी यमसदनाला धाडण्यात भारतीय सैन्याला यश मिळालं.

येत्या 11 जानेवारी 2019 मध्ये 'उरी' हा सिनेमा प्रदर्शित होईल.

https://youtu.be/Cg8sbRFS3zU

Recommended

PeepingMoon Exclusive